राज्य सरकारने प्रयत्न केल्याने वेदांता प्रकल्प पुन्हा येऊ शकतो; रोहित पवार

मुंबई, २१ सप्टेंबर २०२२ : महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू आहे. राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले गेले तर हा प्रकल्प पुन्हा राज्यात येऊ शकतो, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वृत्तवाहिनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

तसेच रोहित पवार पुढं बोलतात की लाखो लोकांना रोजगार मिळवून देणारा वेदांता सारखा प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर जाणं दुर्दैवी आहे. वेदांता प्रकल्पासाठी गुजरातमध्ये कोणतीही जमीन मिळालेली नाही. पण महाविकास आघाडीच्या कार्यकाळात वेदांताला तळेगाव येथे जागा उपलब्ध करून दिली होती, ही जागा योग्य होती. तसेच या प्रकल्पासाठी कंपनीला अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. तरीही वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला.

केंद्रातून प्रकल्प येतात का नाही हे माहित नाही. पण राज्यातले प्रकल्प जातात असं आपण बघितल आहे. असं बोलत रोहित पवारांनी केंद्र सरकारवर टोला लगावलाय.

पण वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला केला असला तरी या प्रकल्पाला गुजरात मध्ये कोणतीही जमीन पसंतीस पडलेली नाही त्यामुळं हा प्रकल्प पुन्हा राज्यात येऊ शकतो. असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा