वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडले

पुरंदर,दि.११ ऑगस्ट २०२०: गेलेल्या दहा दिवसांत नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नीरा खोऱ्यातील सर्व धरणे भरली असून आज वीर धरणातून ८०० क्यूसेस वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आज सकाळी वीर धरण ९४.२६ टक्के भरले. तसेच सोमवारी नीरा खोऱ्यातील धरण परिसरात पाऊस झाल्यामुळे वीर धरणात ५ हजार क्युसेक्सने पाण्याची आवक होत आहे.

संध्याकाळी चारच्या दरम्यान धरणाच्या विद्युत गृहातून नीरा नदीत ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती वीर धरण विभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.

 

 न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा