पळसदेव येथे वीर जवानांचा सत्कार समारंभ संपन्न

इंदापूर, १३ डिसेंबर २०२०: देशाच्या रक्षणासाठी लष्कर मध्ये भरती झालेल्या वीर जवानांचा आज इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे ‘तालीम बॉईज पळसदेव’ यांच्या वतीनं, मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सुरवड गावचे अजय गाजरे, रोहीत वजाने, हनुमंतवाडीचे संजय वाघमोडे, ऋषिकेश शेंडगे, पळसदेवचे प्रितम काळे या जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आपल्या सुपुत्रांना मोठ्या मनानं देशसेवेसाठी रुजू होण्यासाठी प्रेरणा देणारे या जवानांच्या घरच्यांविषयी यावेळी प्रविण माने यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसंच आपलं कौशल्य सिध्द करत या आर्मी भरतीमध्ये चमकलेल्या जवानांचंही याप्रसंगी विशेष कौतुक केलं.

याच सह समृद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धांचाही आज बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी तालीम बॉईज संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर अमोल वागजकर मित्र परिवार पळसदेव यांनी दुसरा क्रमांक मिळवला तर तृतीय क्रमांक संडेला क्रिकेट टीमला मिळाला.

या प्रसंगी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, ग्रा. सदस्य मेघराज कुचेकर, ग्रा सदस्य सुजित मोरे, अनिल कुचेकर ,निलेश रंधवे, अजित शिंदे, ज्ञानेश्वर मरळे, अमोल वागसकर,छगन बनसोडे, बाळासाहेब शिंदे, रावसाहेब काळे, सागर शेलार, अमोल दशरथ गांधी, ऋषी शेलार, सागर कांबळे आदी सहकारी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा