पुण्यात मनसेकडून २०० रुपयात “भाजी बास्केट उपक्रम”

पुणे, दि.३० मे २०२०: सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कुठेच भाजीपाला उपलब्ध होत नाही. त्यामुळे मनसे पुणे शहराच्या वतीने फक्त २०० रुपयात मनसे “भाजी बास्केट उपक्रम” सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.

या उपक्रमांतर्गत पुण्यात आतापर्यंत १९,००० आणि वडगावशेरी मतदारसंघात (प्रभाग १ सहित) दोन हजार “मनसे बास्केट”चे घरपोच वाटप करण्यात आले आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वडगाव शेरी मतदार संघातील हेमंत बत्ते, रमेश जाधव, सुनील कदम, किशोर चिंतामणी, निखिल पवार, बाळासाहेब शिंगाडे, वंदना साळवी, कुलदीप घोडके, दत्ता माळी, महेश शिंदे, अनिल साळुंके व महाराष्ट्र सैनिक यांचे विशेष सहकार्य लाभले .

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा