Pune Agricultural Produce Market Committee : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि. २३) भाजीपाल्यांची आवक ९० ट्रक इतकी झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक कमी झाली असली, तरी काही भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे, तर हिरवी मिरची मात्र ‘आगी’त आहे!
शिमला मिरची, शेवगा आणि भुईमूग शेंगांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागणी घटल्याने या भाज्यांचे दर खाली आले आहेत. फ्लॉवरचे दरही कमी झाले आहेत. हिरवी मिरची मात्र ‘आगी’त आहे. मागणी वाढल्याने आणि आवक घटल्याने हिरवी मिरचीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. मागणी आणि पुरवठा संतुलित असल्याने या भाज्यांच्या दरात फारसा बदल झालेला नाही. कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात आणि करडईच्या भावात वाढ झाली आहे. तर चाकवत, पुदिना, अंबाडी, मुळे, राजगिरा, चुका, चवळई आणि पालकचे भाव स्थिर आहेत.
उन्हामुळे फुले कोमेजून जात आहेत. त्यामुळे फुलांची आवक साधारण आहे. मागणीही कमी असल्याने फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. पपई आणि लिंबाच्या भावात वाढ झाली आहे, तर डाळिंबाच्या भावात घसरण झाली आहे. अननस, संत्रा, मोसंबी, कलिंगड, खरबूज आणि चिकूचे भाव स्थिर आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे