भाजीपाल्याचे दर कडाडले, सामान्यांच्या खिशाला कात्री

मुंबई, ११ ऑक्टोंबर २०२०: आगामी काळात भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. याची चाहूल आत्तापासूनच लागण्यास सुरुवात झालीय. बऱ्याच ठिकाणी बाजारांमध्ये भाजीपाल्यांचे दर वाढलेले दिसून येत आहे त्यामुळं सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे. याचं कारण म्हणजे परतीचा पाऊस भाजीपाल्यांचे दर वाढण्याआधी देखील कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली होती. मागच्या वर्षी प्रमाणे कांद्याचे दर देखील वाढू नये म्हणून केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंद केली होती.

पावसामुळं यंदा कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळं कांद्याच्या दरामध्ये देखील आता हळूहळू वाढ होत आहे. त्यातच नुकत्याच पडलेल्या परतीच्या पावसामुळं भाजीपाल्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यामुळं भाजीपाल्याचा बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. परिणामी भाज्यांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे.

घाऊक आणि किरकोळ दोन्ही बाजारपेठांमध्ये भाववाढ दिसून येत आहे. पालक, मेथी, कोथिंबीर हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि मटार दुप्पट भावानं विकले जात आहेत. भाज्यांसोबतच डाळींचे भाव देखील वाढले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाचं संकट असताना भाज्यांचे आणि डाळींचे दर वाढल्यानं विक्रेते आणि ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

भाजीपाल्यांच्या दोन्ही बाजारात किमती वाढलेल्या दिसून येत आहे. घाऊक बाजार आणि किरकोळ बाजारात दोन्ही विक्रेत्यांनी भाजीपाल्याच्या किमती वाढवल्या आहेत. घाऊक बाजार आणि किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे असलेले दर पुढीलप्रमाणं आहेत.

मटार: घाऊक बाजारातील दर-१५० ते १६०
किरकोळ बाजारातील दर-१६० ते १८०

फरसबी: घाऊक बाजारातील दर-८० ते ९०.
किरकोळ बाजारातील दर-८० ते १००

फ्लॉवर: घाऊक बाजारातील दर-८० ते ९०.
किरकोळ बाजारातील दर- ८० ते १००

शेवगा: घाऊक बाजारातील दर-८० ते ९०. किरकोळ बाजारातील दर-८० ते १००

कोबी: घाऊक बाजारातील दर-४० ते ६०.
किरकोळ बाजारातील दर- ४० ते ७०

भेंडी: घाऊक बाजारातील दर-५० ते ६०. किरकोळ बाजारातील दर-५० ते ८०

गवार: घाऊक बाजारातील दर-९० ते १००. किरकोळ बाजारातील दर-९० ते ११०

टोमॅटो: घाऊक बाजारातील दर-३२. किरकोळ बाजारातील दर- ५० ते ६०

बटाटे: घाऊक बाजारातील दर- ३२. किरकोळ बाजारातील दर- ४०

कोथिंबीर: घाऊक बाजारातील दर-३० किरकोळ बाजारातील दर-५० ते ६०

डाळींचे भाव:

मसूर डाळ: घाऊक बाजार-६३ ते ६८. किरकोळ बाजार- ८० ते ९०

मूंग डाळ: घाऊक बाजार-११०. किरकोळ बाजार-१२०

तूर डाळ: घाऊक बाजार-१२०. किरकोळ बाजार-१३०

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा