पुणे सीमेवर फलटण पोलीसांकडून वाहनांची तपासणी

बारामती : २५ एप्रिल २०२० : पुणे जिल्हा रेड झोन तर सातारा जिल्हा ऑरेंज झोन मध्ये असल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा ग्रामीण पोलिसांनी कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीसही पुण्याच्या सीमेवर, अत्यावश्यक सेवा देणारी वहाने व रुग्णवाहिकेची देखील तपासणी करून मगच बारामतीकडे सोडत आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, बारामती व फलटण तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या पुणे-सातारा सीमेवर सध्या मोठा बंदोबस्त तैनात करून कडक उपाययोजना राबविल्या जात आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक वाहनांमधून गुटखा, दारूची अवैधरित्या वहातूक केली जात आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी दरम्यान अशा वाहनांची तपासणी करताना पर्दाफाश करून कायदेशीर कारवाई देखील झाली आहे. यामुळे अशा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना चांगलाच चाप बसला आहे. बारामती तालुक्यातून फलटण येथे रुग्णालयात जाण्याच्या बहाण्याने पोलीसांना मेडिकलच्या खोट्या चिठ्ठ्या दाखवणाऱ्यांना व मोकाट फिरणाऱ्या लोकांना काठय़ांनी चांगलाच प्रसाद दिला जात आहे. तर अशा मोकाट फिरणाऱ्याला उठा बश्या काढायला लावण्याचे सत्र दररोज सुरूच आहे. बारामती मार्गे फलटणला जाणाऱ्या व फलटण मार्गे बारामतीला जाणाऱ्या सर्वच वाहनांची आतून देखील पहाणी करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा