पंकजा मुंडेंकडून परळी, बीडच्या शासकीय रूग्णालयांना व्हेंटिलेटर्स

बीड, दि.९ मे २०२० : कोरोनाच्या लढाईचा सामना करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी रॅडिको एनव्ही डिस्टिलरीतर्फे बीड व परळी येथील शासकीय कोविड रूग्णालयांना व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत. सदर व्हेंटिलेटर्स आज (शनिवारी) रूग्णालयांना सुपूर्द करण्यात आले.

जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे बीड जिल्हयात कोरोनाचा आकडा सध्या शुन्य आहे. असे असले तरी सध्याची गंभीर परिस्थिती पाहता भविष्यातील काळजी म्हणून आणि परिस्थिती उद्भवल्यास अचानक कोणाची प्रकृती ढासळल्यास कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देण्यासाठी व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासणार आहे.

ही तातडीची गरज लक्षात घेऊन पंकजा मुंडे यांनी रॅडिको एनव्ही डिस्टिलरीच्या वतीने बीड जिल्हा रूग्णालयात तयार होत असलेल्या कोविड रूग्णालयास तसेच परळीच्या उपजिल्हा रूग्णालयास व्हेंटिलेटर्स दिली आहेत.

हे व्हेंटिलेटर्स बीड येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे तर परळी येथे भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, युवा नेते नीलकंठ चाटे, राजेंद्र ओझा, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, विजयकुमार खोसे आदींनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनेश कुरमे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोरे, डॉ.अर्शद शेख, डॉ.रामधन कराड उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा