मुंबई, १५ सप्टेंबर २०२० : राज्यात सुशांत सिंग प्रकरणी कंगना आणि राजकिय नेत्यांमधे चांगलेच जुंपल्याचे पहायला मिळत आहेत.ज्या मधे कंगनाने तर बाॅलिवूड चित्रपट सृष्टीला डायरेक्ट मुव्ही माफीयांचा अड्डा म्हणत हिणवले.त्यात तिने संपूर्ण बाॅलिवूडचा ग्लॅमर असलेल्या पडद्यामागील काळा चेहरा समोर आणला,पण त्यामुळे चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी तिच्या अशा वर्तनाला कडक शब्दात निषेध नोंदवला.
अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी यावर अभिनेत्री कंगन रणौत हिनं बाॅलिवूड माफीया आणि ड्रग कनेक्शन हा मुद्दा ऐरणीवर आणला.याबाबत अनेक खुलासे होत आहेत. बाॅलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटविण्यासठी बाॅलिवूडचा वापर केला जात आहे.ज्या लोकांना इंडिस्ट्रीने नाव दिले आज तेच बाॅलिवूडला गटर संबोधीत आहेत,मी त्याचं समर्थन करणार नाही अशा त्या म्हणला.
कंगनाच्या विधानाला उत्तर
संसदेतील जया बच्चन यांच्या सोमवारी केलेल्या विधानावर आपल्या घरी,मनालीला पोहचलेल्या कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.तिने एका ट्वीट मधे लिहीले,”जया जी तुम्ही तेव्हा ही असेच विधान केले असते का जेव्हा माझ्या जागी तुमची मुलगी असती. श्वेताला टीनएज मधे मारले असते, ड्रग्स दिले असते आणि शोषण केले असते,त्यावेळी तुम्ही हेच म्हटले असते का? आणि अभिषेक लगातार बुलीइंग आणि शोषणची गोष्ट करत असता आणि एक दिवस फाशी वर लटकलेले दिसला असता तर? थोड़ी हमदर्दी हमसे भी दिखाइए।” म्हणत ती जया बच्चन यांना उत्तर दिले आहे.
सध्या दोघींमधील चालेल्या या शाब्दीक युद्धाची सुरवात जया बच्चन यांनी संसदेतून केली होती.तर त्याला आता कंगनाने उत्तर दिले असून पुुढे काय घडेल या कडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी