मुंबई, दि. ३ जुलै २०२०: मराठी व्यवसायिक रंगभूमीवरील जेष्ठ आभिनेते लिलाधर कांबळी यांचा ठाण्यातील राहत्या घरी गुरुवारी प्रदिर्घ आजाराने वयाच्या ८३ व्या दिवशी निधन झाले. ते कँन्सरने गेली २ वर्ष त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
हिमलायाची सावली, प्रेमा तुझा रंग कसा, कस्तुरीमृग, लेकरे उदंड झाली, रामा तुझी सीता माऊली, आमच्या या घरात, दुभंग, वात्रट मेले, वस्त्रहरण, केला तुका आणि झाला मका या आश्या अनेक विविध नाटकांमध्ये त्यांनी काम केले. वस्त्रहरण, केला तुका आणि झाला मका, वात्रट मेले या नाटकांमधील त्यांची भूमिका विशेष गजल्या. फनी थिंग कोल्ड लव्ह या इंग्रजी नाटकामुळे मराठी प्रेक्षकवर्गा बाहेर ही त्यांची ओळख होऊ लागली होती.
डाॅ श्रीराम लागू, प्रशांत दामले, भक्ती बर्वे, सतीष दुभाषी, मच्छींद्र कांबळी, रोहणी हट्टगंडी आदी कलाकारां सोबत त्यांनी काम केले होते. वात्रट मेले, केला तुका झाला मका, मालवणी सौभद्र, चाळगती, सगळे मेले या नाटकांचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते.
आशी बहुआयमी व्यक्तीमहत्व लिलाधर कांबळी यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी जगाच्या रंगभूमीवरुन एक्झिट घेतली.
यांच्या जाण्यामुळे मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी