ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

मुंबई, दि. ३० एप्रिल २०२०: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांना बुधवारी मुंबईच्या एन.एच. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू सिंग रुग्णालयात होत्या. ऋषी कपूर यांच्या रुग्णालयात भरतीची माहिती त्याचा मोठा भाऊ रणधीर कपूर यांनी दिली होती त्यानंतर आज त्यांच्या मृत्यू ची बातमी समोर आली आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ६७ वर्षीयचे होते.

ऋषी कपूर यांना बुधवारी त्यांच्या कुटुंबियांनी एच . एन .रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ते कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यांना श्वास घेण्यास सुद्धा त्रास होत होता. म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अचानक खालवून त्यांचा मृत्यू झाला.

ऋषी कपूर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेतून भारतात परतले होते. तेथे जवळपास एक वर्ष त्याच्यावर कर्करोगावर उपचार सुरू होते. वर्ष २०१८ मध्ये ते कर्करोगाने ग्रस्त असल्याची बातमी मिळाली होती, त्यानंतर ते जवळजवळ एक वर्ष न्यूयॉर्कमध्ये राहिले आणि उपचार घेतलं. नीतू सिंग ऋषी कपूरबरोबर कठीण काळात उभ्या राहिल्या आहेत. ऋषी कपूर उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये होते तेव्हा नीतू सिंग त्याच्यासोबतच राहिल्या.

ऋषी कपूर यांनीही एका मुलाखतीत नीतू सिंगचे कौतुक केले होते. ऋषी कपूर यांनी नीतू कपूर यांचे आभार मानले होते. ते म्हणाले होते की, नीतूशिवाय हे शक्य नव्हते. नीतू माझ्याबरोबर खंबीरपणे उभी होती. मी त्यांच्याशिवाय काहीही करू शकत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा