जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची जगाच्या रंगमंचावरून एक्झिट

मुंबई ,७ मार्च २०२१ : रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटविणारे, अनेक व्यक्तीरेखांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं.वयाच्या ९१ व्या वर्षी त्य़ांनी अखेरचा श्वास घेतला.६ नोव्हेंबर १९१९ मध्ये किर्लोस्करवाडी इथं त्यांचा जन्म झाला होता.

कलाविश्वात नावारुपास येणाऱ्या या अनुभवी कलाकारानं दिल्लीत वृत्त निवेदक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. अतिशय कमी वयापासूनच कलाविश्वाशी नातं जोडलेल्या श्रीकांत मोघे यांच्या जाण्यानं अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. चाहते आणि कलाकार मंडळी या नटश्रेष्ठाला आपल्या परिनं श्रद्धांजली वाहत आहेत.

त्यांची थोडक्यात कारकीर्द….

‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकातील त्यांच्या कामाला प्रेक्षकांची खास पसंती मिळाली. ‘तुज आहे तुजपाशी’, ‘गरुडझेप’, ‘लेकुरे उदंड जाहली’ शिवाय ‘मधुचंद्र’, ‘सिंहासन’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. पुलं यांच्यासोबत ते जवळपास ५० वर्षे कार्यरत होते. श्रीकांत मोघे यांचा मुलगाही कलाविश्वात सक्रीय आहे, श्रीकांत मोघे हे अभिनेता शंतनू मोघे यांचे वडील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा