बॉलिवूडचे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांचं कोरोनाने निधन

नवी दिल्ली, २३ एप्रिल २०२१: प्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण यांची संगीताच्या विश्वातील जोडी तुटली आहे. गुरुवारी संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांचं मुंबईतील एसएल रहाजा रुग्णालयात निधन झालं. ते कोरोना संसर्गाशी लढत होते. त्यांना बर्‍याच वैद्यकीय समस्याही होत्या आणि व्हेंटिलेटरवर होते. रहेजा रुग्णालयाच्या डॉ. कीर्ती भूषण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आणि सांगितलं की श्रवण राठोड यांचं निधन कोरोनामुळं बहु-अवयव निकामी झाल्यामुळं झालं.

श्रवण राठोड यांना हृदयविकाराची गंभीर समस्या होती. मधुमेह आणि कोरोनामुळं तब्येत बिघडली होती. त्यांचा मुलगा संजीव यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते कारण त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क आला होता.

संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड हे ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात २ मुले संजीव आणि दर्शन असा परिवार आहे. ९० च्या दशकात नदीम-श्रवण जोडी खूप लोकप्रिय होती. त्यांच्या हिट चित्रपटांमध्ये आशिकी, दिल है की मांता नहीं, साजन, परदेश, रोड आणि बऱ्याच चित्रपटांचा समावेश आहे.

तथापि, २००० च्या सुरुवातीस नदीम देशाबाहेर गेले आणि संगीतकार नदीम-श्रवण ही जोडी तुटली. २००९ मध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट डो नॉट डिस्टर्ब होता.

नदीम आणि श्रवण यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार जिंकले. आशिकी, राजा हिंदुस्तानी, साजन आणि दिवाना या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्याचवेळी श्रवणचे भाऊ रूपकुमार राठोड आणि विनोद राठोड हे गायक देखील आहेत. दोघांनीही अनेक हिट गाणी दिली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा