दिग्गज नेता हरपला….

पुणे, १८ ऑगस्ट २०२०: कोरोनाने भारतात आत्तापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. यामुळे ब-याच जणांचे परिवार उद्धवस्त झाले आहेत. तसेच कोरोनाचे तांडव अजूनही राज्यात व देशात चालूच आहे. लहान मुले, गर्भवती महिला तसेच वयोवृद्ध यांना कोरोनाने जास्त प्रमाणात आपले शिकार केले आहे. यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. पंढरपुरचे दिग्गज आणि जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे देखील सोमवारी कोरोनामुळे निधन झाले आहे.

वयाच्या ८५ व्या वर्षी सुधाकरपंत यांनी पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या वर उपचार सुरु होते आणि अखेर शेवटी कोरोना बरोबरची त्यांची जीवन संघर्षाची झुंज अपयशी ठरली. सुधाकरपंत यांच्यावर कोरोनाच्या सर्व नियम अटीसह अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या नातवाईकांनी दिली आहे.

सुधाकरपंत परिचारकांचा अल्प परिचय….

गेली २५ वर्ष सुधाकरपंत यांनी विधानसभा गाजवली आहे. २५ वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची आमदारकी भुषवली होती. राष्ट्रवादी पक्षात ते अनेक वर्ष आमदार होते. त्यानंतर त्यांनी २०१४ च्या निवडणुकी पासून राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि नंतर शिवसेना भाजप युती बरोबर ते उभे राहीले ज्या मध्ये २०१९ च्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणुक लढवली ज्यामधे त्यांचा पराभव झाला.

सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून आज सुधाकरपंत यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा