दिग्गज कवी अमजद इस्लाम अमजद यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी २०२३ :पाकिस्तानचे प्रसिद्ध कवी, नाटककार अमजद इस्लाम अमजद यांचे लाहोरमध्ये निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अमजद इस्लाम अमजद यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला असून, ते काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, अमजद इस्लाम अमजद यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४४ ला लाहोरमध्ये झाला. ते तिथेच मोठे झाले आणि त्यांनी १९६७ मध्ये पंजाब विद्यापीठातून उर्दूमध्ये एमए केले आणि नंतर अध्यापन विभागात रुजू झाले.

अमजद अस्लम अमजद यांची गणना उर्दूच्या सर्वोत्तम शिक्षकांमध्ये केली जाते. पाकिस्तानातच नव्हे तर परदेशातही त्यांचा गौरव झाला आहे. त्यांना तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या हस्ते नेसिप फाझिल आंतरराष्ट्रीय संस्कृती आणि कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. समारंभाला संबोधित करताना, तुर्की नेते म्हणाले होते की, अमजद इस्लाम अमजद हे आधुनिक उर्दू साहित्यातील सर्वात महत्वाचे कवी आहेत.

अमजद अस्लम अमजद यांना सितारा-ए-इम्तियाज (पाकिस्तानचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार) आणि तमगा-ए-हुस्ननेही सन्मानित करण्यात आले आहे.

  • गायक अदनान सामीकडून शोक व्यक्त
https://www.instagram.com/p/CofzR0WMaop/?igshid=YmMyMTA2M2Y=

अमजद अस्लम अमजद यांच्यासोबत अनेकदा स्टेज शोमध्ये सादरीकरण करणारे प्रसिद्ध गायक अदनान सामी यांनी त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ज्येष्ठ कवी अजमद इस्लाम अमजद साहिब यांच्या निधनाच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले. ते केवळ साहित्यिक प्रतिभाशालीच नव्हते तर अतिशय उदार आणि मैत्रीपूर्ण व्यक्ती देखील होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा