जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन

6

ठाणे, ३ नोव्हेंबर २०२० : जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं आज दुपारी ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ इथल्या खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. दिनकर पणशीकर यांनी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली होती.

याशिवाय ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातही त्यांनी भूमीका केली होती. ‘आडा चौताला’ सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो. गोवा कला अकादमीचे ते ‘संगीत विभाग प्रमुख’ होते.

त्यांनी शेकडो शिष्य घडवले. गोवा राज्य पुरस्कार, कोलकाता संगीत रिसर्च अकादमी पुरस्कारासह षडाक्षरी गवई, गानवर्धन, चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१७ साली केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे त्यांना पाठ्यवृत्ती प्रदान करण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी


कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा