उपराष्ट्रपती जगदीप धनखड व राज्यपाल रमेश बैस आज नागपूरात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवात होणार सहभागी

नागपूर, ४ ऑगस्ट २०२३: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर आज दुपारी ४ वाजता आगमन झाले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आजच्या एक दिवसीय दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपूर येथे आले आहेत. रेल्वे स्थानकावर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्यपाल एक दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून आज रात्री राजभवनात त्यांचा मुक्काम आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वार्षिक प्रणिती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

रात्री ९.२० वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करतील. सुमारे सहा तास उपराष्ट्रपती जगदीप धनखड नागपूरात असणार आहेत. या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस त्यांच्या सोबत असतील. उद्या सकाळी दि. ५ ऑगस्टला सकाळी ९ वाजता मुंबईसाठी ते रवाना होतील. असे सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा