लखनऊ, २५ नोव्हेंबर २०२०: ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु मौलाना डॉ. कल्बे सादिक यांचं मंगळवारी उशिरा निधन झालं. १७ नोव्हेंबरपासून त्यांच्यावर राजधानीच्या इरा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. मुलगा मौलाना कल्बे सिब्ते नूरी म्हणाले की डॉ. कल्बे सादिक यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. मंगळवारी संध्याकाळी रक्तदाब आणि ऑक्सिजनच्या पातळीत सातत्यानं घसरण आल्यानंतर त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) मध्ये हलविण्यात आलं. नंतर बुधवारी दुपारी, त्यांना इमामबाड़ा गुफरमब चौक येथे सिपुर्द-ए-खाक करण्यात आलं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो व कुटुंबियांना आधार मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली. मौलाना कल्बे सादिक यांचा जन्म २२ जून १९३९ रोजी लखनऊ येथे झाला होता. ते उदारमतवादी प्रतिमेसाठी जगभरात ओळखले जात असे. शिक्षणासाठी त्यांनी बरीच कामे केली. त्यांच्या निधनानं राजधानी लखनौसह जगभरात शोकांची लाट पसरली आहे. मौलाना इमाम ईदगाह मौलाना खालिद रशीद फरांगी महाली म्हणाले की त्यांनी मानव जातीला धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश दिला होता.
मौलाना इमाम ईदगाह मौलाना खालिद रशीद फरांगी महाली म्हणाले की, त्यांनी आपल्या धर्म आणि जातीपेक्षा श्रेष्ठ असा सामाजिक माणुसकीचा धडा शिकविला. प्रख्यात डॉ. सादिक हे देश-विदेशात शिक्षणासाठी आणि विशेषतः मुली आणि गरीब मुलांसाठी नेहमीच कार्यरत होते. ते युनिटी कॉलेज आणि एरा मेडिकल कॉलेजचे संरक्षक देखील होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे