रयत क्रांती संघटनेची माढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सलामी

माढा, २० जानेवारी २०२१: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माढा तालुक्यात रयत क्रांती संघटनेचे ८ जागांवर ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत असे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे मा सदस्य प्रा सुहास पाटील यांनी सांगितले. रिधोरे ग्रामपंचायत निवडणुकीत रयत विकास पॅनलने ६ जागा जिंकून ग्रामपंचायत ताब्यात घेत परिवर्तन केले. रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक बळीराम लक्ष्मण गायकवाड, विक्रमसिंह विलास महाडिक, स्नेहल समाधान गायकवाड, जाहिरा जावेद शेख, नागनाथ माणिक राऊत, गायत्री लखन कसबे या सहा जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, तानाजी (आबा) गायकवाड,भारत (आप्पा) गायकवाड, भागवत गायकवाड, शिवाजी गायकवाड यांनी प्रमुख भूमिका बजावली. मोडनिंब येथील ग्रामपंचायत निवडणुकीत रयत बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष संजीव (गोटू )शिंदे यांच्या पत्नी योगीता संजीव शिंदे व रयत क्रांतीचे तालुका उपाध्यक्ष अमर ओहोळ हे विजयी झाले. यांच्या विजयात शिवाजी सुर्वे यांनी प्रमुख भूमिका बजावली.

या सर्वांचा सत्कार रयतचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा सुहास पाटील यांच्या उजनी (टें) येथील निवासस्थानी करण्यात आला. या प्रसंगी बोलताना प्रा. पाटील म्हणाले, “माजी कृषी राज्यमंत्री आ सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून माढा तालुक्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मिळवून दिला. रयत बांधकाम कामगार संघटना उभा करून ६ हजार कामगारांची नोंदणी करीत त्यांना आर्थिक लाभ मिळवून दिला. रस्ते, पाणीपुरवठा योजना, हायमास्ट दिवे यासारखी अनेक कामे मार्गी लावले आहेत. इथून पुढील भविष्यकाळात रयत क्रांती संघटनेच्या वतीने अनेक समाजोपयोगी व विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत.”

यावेळी शिवाजी सुर्वे, तानाजी (आबा) गायकवाड,रयत क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष कुंदन वजाळे, प्रमोद गाडे, बालाजी वाघमारे, गौतम ओहोळ, दीपक ओहोळ, प्रशांत करळे, नारायण गायकवाड, धनंजय कारंडे, भारत गायकवाड, शिवाजी गायकवाड,सतिश ओहोळ,अभिमान शिंदे,चंद्रकांत ओहोळ आदीजण उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा