नवी दिल्ली, दि.८ मे २०२०: पश्चिम आफ्रिकेत निर्माण झालेल्या धुळीच्या वादळाचा सामना सध्या तिथल्या नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अजून भयानक म्हणजे या वादळामुळे घराच्या भिंती देखील झाकल्या गेल्या आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पहायला मिळत आहे.
पश्चिम आफ्रिकेच्या नायजर देशात हा सर्व प्रकार घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या घटनेचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.
ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक लालसर प्रकारच्या धूळीने घर, इमारतींना झाकून टाकले आहे. त्या इमारतीच्या शेकडो मीटर उंच हे वादळ होते. या काळात धुळीचे वादळ पश्चिम आफ्रिकेसाठी सर्वसामान्य बाब असल्याचे सांगितले जाते. या धुळीमुळे आकाशाचा रंग देखील बदल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी या वादळाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.की, हे भयानक वादळ कितीतरी मिनिटे होते व वादळानंतर मुसळधार पाऊस देखीलया भागात पडला. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला असल्याचे देखील मते नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: