विधानसभा अध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर ; मतदारसंघातील कामांसाठी भेटीगाठी घेणार असल्याची माहिती

11

नवी दिल्ली, २४ मे २०२३: राज्यातील सत्तासंघर्षात १६ आमदार अपात्रतेचा महत्त्वाच्या मुद्यांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने विधानसभा अध्यक्षांवर सोडला आहे. सत्तासंघर्षावरील निकालानंतर पहील्यांदाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दिल्ली दौऱ्यावर पोहचल्याने अनेक राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

तर आपण कुठल्याही राजकीय भेटीगाठी घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा निर्णय घेण्यापूर्वी ते काही कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञांची भेटी घेणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून नवीन संसद भवनाच्या उद्धाटनाचे निमंत्रण मिळाले आहे का? असा सवाल विचारला असता या संबंधी विधीमंडळ सचिवालाकडे माहिती मिळेल. अद्याप यासंदर्भात माझ्याकडे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मतदार संघातील काही कामे हाती. या अनुषंगाने दिल्ली दौऱ्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहंताची भेट घेतली का असं विचारलं तर ते म्हणाले की अनेक लोकांना भेटत असतो. आणि अनेकदा दिल्लीत येत असतो. परंतु सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पहील्यांदाच दिल्लीत आलो असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर