गोल पोस्ट राजकारण विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले बिनविरोध निवडून आले.
याबाबत माहिती देताना, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, काल रात्रीपासूनच सत्ताधारी पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला वारंवार आवाहन केले होते की, विधानसभा अध्यक्षपद हे वादातीत असावे, यासाठी भाजपाने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा. या पार्श्वभूमीवर सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक होऊन चर्चा झाली.

error: Content is protected !!
Exit mobile version