नवी दिल्ली, ८ जुलै २०२० : देशातील कोरोनचा वाढता प्रार्दुभाव आणि संकट बघता CBSE बोर्डाने ९ वी पासून १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात जवळपास ३० टक्के भाग कमी करण्याचे ठरवले आहे. या मध्ये धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद हा अभ्यासक्रम वगळला आहे. NCERT आणि CBSE बोर्डाच्या तज्ज्ञांच्या समितीने एक आराखडा तयार केला आहे. त्यानुसारच ९ वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि ९ वी खालील वर्गांचा अभ्यासक्रमांचा आराखडा शाळेला तयार करण्यास सांगितले आहे.
११ वीच्या अभ्यासक्रमातील बदल पुढील प्रमाणे
११ वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून भारताची संघराज्य पद्धती, राज्य सरकार, नागरिकत्व, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता असे विषय वगळण्यात आले आहेत. हा अभ्यासक्रम एका वर्षासाठीच काढला आहे.
१२ वीच्या अभ्यासक्रमातील बदल पुढील प्रमाणे
१२ वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून भारतीय अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरुप, निती आयोग, जीएसटी असे विषय शिकवले जाणार नाहीत. यासोबतच संरक्षण, पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्तीशी संबंधित विषयाचा अभ्यासक्रम सुद्धा वगळण्यात आला आहेत.
तसेच भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आणि म्यानमार यांच्याशी संबंधित धडे सुद्धा हटवण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी