बारामती, दि. २४ जून २०२० : बारामती दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अद्याप शिक्षणसंस्था बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण मिळण्यासाठी माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयातर्फे जागतिक दर्जाच्या आॅनलाइन कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ऑनलाईन कोर्सेस हे ४००० हून अधिक विविध विषयांवर आधारित आहेत. तसेच ४०० हून अधिक स्पेशलायझेशन सहीत उपलब्ध आहेत. कोरसेरा मार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्कृष्ठ विद्यापिठातून जसे स्टॅन्डफोर्ड, मिशीगण, ड्युक तसेच मानांकीत कंपन्या उदा. गुगल, आयबीएम, इंटेल, मायक्रोसॉफ्ट इं. जागतिक दर्जाच्या संस्थांमधील तज्ञांनी तयार केलेले कोर्सेस करून विद्यापिठाचे व कंपन्यांचे सटीर्फीकेट्स मिळवण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.मुकणे यांनी दिली.
सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच त्यांना घरी राहूनच सुट्टीच्या कालावधीत महाविद्यालयातील शिक्षकांनी तयार केलेल्या व्हिडीओ लेक्चर बरोबरच जागतिक दर्जाच्या विविध कोर्सेसचे शिक्षण घेता यावे. यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी जवळ-जवळ ४००० इतके आॅनलाईन कोर्सेस कोरसेरा या संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिले
आहेत. आतापर्यंत जवळपास ३००० हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी याचा लाभ घेऊन जवळपास ७०० कोर्सेस
यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यासाठी
महाविद्यालयातील प्रा. माधव राऊळ व प्रा. हेमंत कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष, विश्वस्त व सचिव यांनी अभिनंदन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव