विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला

यवतमाळ : येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेण्याचा प्रयत्न आरडाओरडा केल्याने अयशस्वी ठरला. विद्यार्थिनीने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने विद्यार्थिनीला पळविण्याचा डाव फसला. ही घटना यवतमाळ येथील आयुर्वेदिक रुग्णालयासमोर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, एक विद्यार्थिनी शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. एक तरुण काही दिवसापासून तिचा पाठलाग करीत होता. दरम्यान, मजनू आज चक्क कार घेऊन आला. विद्यार्थिनीला कारमध्ये जबरदस्तीने कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. मुलीने समय सुचकता दाखवत आरडाओरड केला. त्यामुळे नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे पळून जाण्याचा बेत फसला. नागरिकांनी तरुणाला बाहेर येण्यास सांगितले. काही मिनिटे तरुण बाहेर आला नाही.

संधी साधून तरुणाने पळ काढला. मात्र, नागरिकांनी पाठलाग करून मजनूला पकडले आणि चोप दिला. काही नागरिकांनी अधिक चोप देण्यास विरोध करीत त्याला अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा