नवी दिल्ली : पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने एसबीआयसह अनेक बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करून तिचा लिलाव करून विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ईडीनेही या वसुलीवर काहीच आक्षेप नसल्याचे कोर्टाला सांगितले होते. त्यामुळेही कोर्टाने मल्ल्याची संपत्ती वसूल करण्याची बँकांना परवानगी दिली आहे.
किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेल्या विजय मल्ल्यावर ९ हजार कोटींची फसवणूक केल्याचा तसेच मनी लाँडरिंगचा आरोप आहे.
त्यामुळे त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे.