विजय वड्डेडीवार: आमदार खरेदीसाठी ५० कोटींची ऑफर

मुंबई: काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वड्डेडीवार यांनी भाजपवर गंभीर आरोप लावला आहे. ते म्हणाले की भाजपने शिवसेना आमदार फोडण्यासाठी ५० कोटींची ऑफर केली आहे. एका आमदारांसाठी ५० हजार कोटी एवढी रक्कम लावण्यात आली आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ” भाजपकडून शिवसेनेच्या काही आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे शिवसेनेच्या काही आमदारांसोबत संपर्कही साधला आहे, आम्हाला असे समजल्यावर आम्ही आमच्या आमदारांना संपर्क केला. आम्हाला आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. मागच्या निवडणुकीला असेच झाले होते परंतु त्याचा काय परिणाम होतो हे तुम्ही बघितले आहे, यावेळेस असे झाले तर आम्ही पुन्हा त्यांना पक्षात घेणार नाही. वारंवार पक्ष्याशी आणि जनतेशी गद्दारी करणे कोण सहन करणार आहे.”

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा