जयश्री ची विजयश्री

कोल्हापूर १६ एप्रिल २०२२ : कोल्हापूरचा रणसंग्राम अखेर पार पडला. भाजप आणि कॅांग्रेस असा हा चुरशीचा सामना रंगला. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर काय निकाल लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते आणि अखेर जयश्री जाधव यांनी विजयाची विरश्री मिळवली.
कोल्हापूरची ही पोट निवडणूक म्हणजे इज्जत आणि इभ्रत यांचा मेळ होता.

चंद्रकांत पाटील यांचा प्रभाव इथे कमी पडला आणि भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव झाला. भाजीसाठी हा धक्का नसला तरी याचे पडसाद निवडणुकीत पहायला मिळणार हे नक्की.

जयश्री जाधव यांना चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर मानसिक आणि मतांचा पाठिंबा मिळणार होता हे नक्की होते. जे या निवडणुकीत पहायला मिळालं. कोल्हापूरात कॅांग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात बसलेल्या चंद्रकांत दादांचा शब्द मी पाळला, अण्णांचा शब्द मी पाळला, असे विजयाचे उद्गार काढत जयश्री जाधव भावुक झाल्या. जयश्री ताईंना ९४,७६७ मते मिळाली तर सत्यजित कदम सूंनी ७७,४२६ मते मिळाली. हात मतांमधला फरक नक्की आगामी काळात काय घोळ घालणार की भाजपला मदत करणार हे नक्कीच औत्सुक्याचं आहे.

आज कोल्हापूर गुलालाने रंगून गेलं आणि आसमंत गुलाबी होऊन गेला. महाविकास आघाडी अजूनही तग धरुन आहे आणि इथून पुढे आघाडी काय पावलं उचलते, यावर खरे भवितव्य अवलंबून आहे हे खरं. चंद्रकांत पाटील यांनी पाठित खुपसलेला खंजीर आणि त्यामुळेच भाजपचा पराभव असे मत आघाडीच्या नेत्यांचे आहे. त्यामुळे दादा, तुमच्यावर भरवसा नाय म्हणायची वेळ भाजपवर तर आली नाही ना? हे नक्कीच पहावं लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा