विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आमदार रोहित पवार यांना निवेदन

कर्जत, दि.१०.जून.२०२०: निसर्गाच्या संकटामुळे मागील वर्षी डाळिंबाचा पिक विमा मिळालेला नाही. वारंवार मागणी करून देखील विमा कंपन्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची दाद देत नाहीत. यामुळे कर्जत येथील शेतकऱ्यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना निवेदन दिले.

कर्जत तालुक्यातील आणि श्रीगोंदा तालुका यासह परिसरातील शेतक-यांनी डाळींबाचा विमा , विमा कंपन्यांकडून उतरवलेला होता.परंतु विमा कंपन्या शेतकऱ्यांना काही केल्या कसल्याही प्रकारची दाद देण्यास तयार नाहीत. वारंवार मागणी करूनही देखील शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. कारण डाळींबाचे पिक हे मागच्या वर्षी पुर्णपणे नष्ट झाले होते. यामुळे कर्जत मधील सचिन पवार, योगेश जामदार,विकास जामदार,या शेतकऱ्यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना भेटून या बाबतीत निवेदन दिले.

यानंतर आमदार रोहित पवार यांनी तात्काळ कृषी जिल्हा अधिकारी जगताप यांच्याशी संपर्क साधला पिक विमा विषय सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांना डाळींबाचे पिक विमा मिळुन देऊ असे आश्वासन दिले. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा