कॅनडा :कॅनडाच्या मॉन्ट्रियल ट्रूडो या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. या विमानतळावर एका विमानाचे उड्डाण घेताच मुख्य लँडिंग गेअरचं एक चाक अचानक गळून पडलं. त्यात विमानात बसलेल्या एका प्रवाशाने आपल्या फोनमध्ये हा व्हि़डीओ रेकॉर्डही केला आहे. असं असलं तरी पायलटच्या प्रसंगावधानामुळे विमानातील ४९ प्रवासी सुखरुप असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एअर कॅनडाचं ८६८४ क्रमांकाचे हे विमान ट्रूडो आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बगोटविलसाठी उडत असताना विमानाने उड्डाण करताच विमानाच्या लँडिंग गेअरच्या एका चाकाच्या जवळ थिणग्या निघून आग लागल्याचं एका प्रवाशाला दिसलं. काही वेळातच या गेअरचं एक चाक गळून पडलं. संबंधित प्रवाशाने याचा व्हिडीओ देखील काढला आहे.
लँडिग गेअरचं चाक गळाल्याचं पाहिल्यानंतर संबंधित प्रवाशाने याची माहिती तात्काळ विमान पायलटला दिली. यानंतर पायलटने विमानाला पुन्हा एअरपोर्टवर सुरक्षित उतरवलं. प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला.