नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवेबद्दल माढा तालुक्याचे सुपुत्र विनायक दडस पाटील यांना ‘विशेष सेवा पदक’

माढा, २ जानेवारी २०२१: गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात सामाजिक सलोखा, शांतता अबाधित राखण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील युवकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले. अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट असणाऱ्या भागात आपल्या चोख कामगिरीने अवैद्य धंदेवाईकाचे धाबे दणाणून सोडले.

त्याचबरोबर या भागात नैसर्गिक साधनसंपत्तीची तस्करीही मोठ्या प्रमाणात होते. मात्र, तस्करांसाठी विनायक दडस पाटील कर्दनकाळ ठरले. त्यांच्या कर्तव्यदक्ष प्रामाणिक कर्तव्याची मदत गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिकांना झाली.

गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात सेवा बजावणारे माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द चे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील यांना महाराष्ट्र शासन गृह विभागाने नक्षलग्रस्त भागात केलेल्या खडतर सेवेबद्दल विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा