विनोद कांबळीला बाप्पा पावला… मालकाने घरी येऊन दिलं ऑफर लेटर, थेट झाला मोठ्या कंपनीचा संचालक

मुंबई, ३ सप्टेंबर २०२२: मागच्या काही दिवसांपासून विनोद कांबळी चर्चेत आहे. आर्थिक अडचणींचा सामना करत असलेला विनोद कांबळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवृत्तीवेतनावर त्याचं घर चालवत होता. आपल्याकडे कोणतेही काम नाही आणि आपण पेन्शनवर जगत असल्याचे कांबळीने सांगितले होते.

ही बातमी अहमदनगरच्या सह्याद्री मल्टीस्टेटचे चेअरमन संदीप थोरात यांनी पाहिल्यानंतर त्यांनी थेट विनोदला नोकरीची ऑफर दिली होती. संदीप थोरात यांनी विनोद कांबळीला एक लाख रुपये प्रति महिना पगाराची नोकरी ऑफर करण्याचे ठरवले होते. पण गेले काही दिवस या प्रस्तावाचे नेमके काय झाले, याबाबत कोणतीच माहिती येत नव्हती. पण आता याबाबतची माहिती समोर आली आहे.

मराठी उद्योजक आणि सह्यद्री मल्टिस्टेट फायनान्स कंपनीचे चेअरमन संदीप थोरात यांनी विनोद कांबळीच्या घरी जाऊन नोकरीचं ऑफर लेटर दिलं आणि विनोद कांबळीने ही ऑफर स्विकारली आहे. एकेकाळी क्रिकेटमध्ये कामगिरी करणारा विनोद कांबळी आता सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीच्या मुंबई शाखेत मानद संचालक म्हणून कामकाज करणार आहेत.

काय म्हणाले होते संदीप थोरात?

थोरात यांनी जेव्हा पहिल्यांदा कांबळीला ऑफर केली होती, तेव्हा आपले मत त्यांनी व्यक्त केले होते. ते देशासाठी खेळलेल्या महान खेळाडूवर अशी परिस्थिती आल्यानंतर नक्कीच ती विचार करायला लावणारी आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही त्यांना ही नोकरी ऑफर दिली आहे. सह्याद्री मल्टीस्टेटचे मुंबई येथे फायनान्स कंपनीची शाखा सुरू होणार आहे. त्या शाखेच्या व्यवस्थापक पदासाठी आपण त्यांना ही नोकरी देणार असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा