पश्चिम बंगाल पंचायत निवडणुक मतदानावेळी हिंसाचार, ममता बॅनर्जी सरकारला उच्च न्यायालयाचा झटका

कोलकाता, ११ जुलै २०२३ : पश्चिम बंगालमध्ये पंचायत समिती निवडणूक मतदानादिवशी झालेल्या हिंसाचाराची, कोलकाता उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने तत्काळ अहवाल सादर करा, असे निर्देश न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला दिले आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती.

अधीर रंजन चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर, कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवग्ननम आणि न्यायमूर्ती हिराणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. राज्य सरकारने मतदानाच्या दिवशी झालेल्या हिंसाचार प्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल दाखल करावा, आम्ही या मुद्द्यावर विचार करु असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

आमच्याकडून अहवाल दाखल केला जाईल, असे राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता एसएन मुखर्जी यांनी सांगितले आहे. मतदानादिवशी हिंसाचारात जखमी झालेल्यांना तत्काळ आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाव्यात, असे आदेशही खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा