‘या’ आमदाराच्या घरासमोर हिंसा, २ लोक ठार तर ६० पोलिस जखमी…

बेंगलुरु, १२ ऑगस्ट २०२०: कर्नाटकची राजधानी बेंगलुरूमध्ये काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर जमावाने हल्ला केला आहे. जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. याशिवाय घराच्या बाहेर जाळपोळ केल्याची घटनाही घडली आहे. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.

पोलिस आणि लोक यांच्यात झालेल्या चकमकीत ६० पोलिसही जखमी झाले आहेत. आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या निवासस्थानासमवेत बंगळुरू पूर्वेतील केजे हळ्ळी पोलिस स्टेशनवर जमावाने हल्ला केला. हा हल्ला सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पोस्टच्या विरोधात करण्यात आला आहे. ही पोस्ट आमदाराच्या पुतण्याने केली आहे. पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उपद्रवी व्यक्तींवर कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी गोळीबारही केला आहे. यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. असे म्हटले जात आहे की या पोस्टमुळे या भागात जातीय हिंसा भडकली होती. उपद्रव्यांनी वाहनांनाही आग लावली. दरम्यान, आमदार श्रीनिवास मूर्ती यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे.

६० पोलिस जखमी झाले

बेंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत यांनी सांगितले की, बेंगळुरूमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ते म्हणाले की, पोलिस आणि लोक यांच्यात झालेल्या चकमकीत एसीपीसह ६० पोलिस जखमी झाले.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा