नवी दिल्ली: राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना उद्देशून विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला. पंतप्रधान मोदी या बैठकीत म्हणाले की, विरोधी पक्ष अनेक मुद्द्यांवर पाकिस्तानची भाषा बोलत आहे, ज्याप्रकारे पाकिस्तान बोलतो त्याच प्रमाणे विपक्ष बोलतात. या व्यतिरिक्त पंतप्रधानांनी खासदारांना कॅबबद्दल सामान्य लोकांना सांगण्याचे आवाहन केले.
नरेंद्र मोदी खासदारांना म्हणाले की नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या फायद्यांबद्दल सामान्य लोकांना सांगण्याची गरज आहे, फक्त विधेयक मंजूर करणे सर्व काही नाही. त्याचबरोबर पंतप्रधान म्हणाले की या विधेयकाबाबत पसरलेले गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. विरोधकांकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की बऱ्याच मुद्द्यांवर विरोधी पक्ष पाकिस्तानची भाषा बोलतोय, अगदी फुलस्टॉप-कोमा अगदी सारखाच असतो.