गोल पोस्ट स्पॉटलाइट विराट कोहलीने भूटानमध्ये अनुष्का शर्मासमवेत एक अनोखा वाढदिवस साजरा केला.

विराट कोहलीने भूटानमध्ये अनुष्का शर्मासमवेत एक अनोखा वाढदिवस साजरा केला.

भुटान: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे प्राणी आणि निसर्गावर विशेष प्रेम करतात हे रहस्य नाही. खरं तर या दोन गोष्टींमध्ये दोघांनी विराटच्या वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. विराट आज ३१ वर्षाचा झाला आहे आणि तो आपला वाढदिवस पत्नी अनुष्कासमवेत भूतानमध्ये साजरा करीत आहे. अनुष्काने इंस्टाग्राम वर विराटच्या ट्रेकिंगचे फोटो टाकले आहेत. तिने तिचा अनुभव सांगत असे म्हटले की येथील लोकांचा पाहुणचार हदयस्पर्शी आहे प्रियांका आणि विराट यांचा सेलिब्रिटी स्टेटस इथल्या लोकांना माहित नसतानाही त्यांनी दोघांना चहासाठी आमंत्रण दिले.
अनुष्काने चाहत्यांना सहलीचा तपशील शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली. तिने लिहिले, “आज आमच्या ८.५ कि.मी.च्या चढाईच्या वेळी आम्ही डोंगरावर असलेल्या एका छोट्या गावातून फक्त ४ महिन्यांपूर्वी जन्मलेल्या एका वासराला गोंजारले आणि खायला घालण्यासाठी थांबलो. आम्ही हे करत असताना घराच्या मालकाने आम्हाला विचारले की तुम्ही थकले आहात का? तुम्ही चहा घेऊ इच्छिता का? म्हणून आम्ही या सुंदर आणि उबदार कुटुंबाच्या घरी गेलो ज्यांना आम्ही कोण आहोत याची काहीच कल्पना नव्हती आणि तरीही त्यांनी आमच्याशी अशा प्रेमळपणाने आणि प्रेमाने वागवले. आम्ही त्यांच्याबरोबर काही वेळ गप्पा मारल्या.

error: Content is protected !!
Exit mobile version