विराट कोहलीचे आयसीसी च्या टॉप-१० मध्ये पुनरागमन

मेलबर्न ऑस्ट्रेलिया, २७ ऑक्टोबर २०२२ : टी-२० वर्ल्डकप मध्ये पाकिस्तानविरुद्ध धडाकेबाज खेळी करून विराट कोहली ६३५ गुणांसह टी-२० क्रमवारीत ९ व्या स्थानावर परतला आहे. तीन महिन्यांपूर्वी आशिया कपच्या सुरवातीला विराटचे आयसीसी रँकिंग होते ३५. यानंतर कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले आणि तो १५ व्या स्थानावर पोहोचला होता. पाकिस्तानविरुद्धच्या ८२ धावांच्या खेळीने विराट आता पुन्हा टॉप १० मध्ये आला आहे.

आयसीसी रँकिंग मध्ये भारताच्या सूर्यकुमार यादवला एका धावेचा फटका बसला. तो आता दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम पाचव्या तर इंग्लंडचा डेव्हिड मलान सहाव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच सातव्या तर श्रीलंकेचा पथुन निसंका आठव्या क्रमांकावर आहे. यूएईचा मोहम्मद वसीम दहाव्या क्रमांकावर आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा १६ व्या तर केएल राहुल १८ व्या स्थानावर आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम टीम इंडिया विरुद्ध गोल्डन डकचा बळी ठरला. याचा फटका त्याला क्रमवारीतही सहन करावा लागला. बाबरची आता चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली हे दोनच भारतीय फलंदाज टॉप-१० मध्ये आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा