नवी दिल्ली : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ८ डिसेंबरला दुसरा टी२० सामना पार पडला.
ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने ८ विकेट्सने विजय मिळवला. भारतीय संघाचा कर्णधार व अव्वल फलंदाज विराटला या सामन्यात केवळ १९ धावा करता आल्या. परंतू तरीही तो आता आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
या सामन्याच्या आधी भारताचा रोहित शर्मा याबाबतीत अव्वल क्रमांकावर होता. तर विराट दुसऱ्या क्रमांकावर होता. या दोघांमध्ये केवळ ३धावांचे अंतर होते.
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
▪ २५६३ धावा – विराट कोहली (७४ सामने)
▪ २५६२धावा – रोहित शर्मा (१०३ सामने)
▪ २४३६ धावा – मार्टिन गप्टिल (८३ सामने)
▪ २२६३धावा – शोएब मलिक (१११सामने)
▪ २१४० धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (७१सामने)