गोल पोस्ट महाराष्ट्र विरोधात बसून जनतेची सेवा करा – आरएसएस

विरोधात बसून जनतेची सेवा करा – आरएसएस

नागपूर : शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करु नका. असे मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. असल्याची माहिती एक इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार बनवणार असेल तर त्यांना सरकार स्थापन करु द्या. विरोधी पक्षात राहून जनतेची सेवा करण्यासाठी तयार राहा. दीर्घकाळाचा विचार करता भाजपासाठी ते हिताचे राहणार नाही असे भागवत यांनी सांगितले.

शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सोमवारी मोहन भागवत यांना पत्र लिहून शिवसेना-भाजपामध्ये सुरु असलेल्या संघर्षात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करणार नाही असेही भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version