उजनीत पुन्हा ३० हजाराने विसर्ग. धरण प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने चालूवर्षी अजूनपर्यंत तरी पुराचा धोका नाही.

6

माढा, दि.१९ सप्टेंबर २०२०: उजनीतून पुन्हा भीमा नदीत तीस हजार क्युसेक्स विसर्ग सुरू. भीमा खोऱ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे उजनीत येणारा विसर्ग वाढला असून भीमानदीला सोडण्यात येणाऱ्या विसर्गात पुन्हा उजनी धरण व्यवस्थापन विभागाने वाढ केली आहे.

यामुळे निरानरसिंगपूर संगमजवळ नीरा व भीमानदी ची मिळून ४८६८१ क्यूसेक वर लेवल गेली आहे. तर पंढरपूर येथे ५४१७५ क्यूसेक वर लेवल गेली आहे. शुक्रवारच्या पावसाने शनिवारी टप्प्या टप्प्याने वाढ करून ती ३० हजार क्यूसेक वर स्थिरावली आहे.एकूण ४१ पैकी १६ गेट ०. १५ मीटर उचलून हा विसर्ग सोडण्यात आला.

धरण प्रशासनाने चालूवर्षी पाणी सोडण्याचे नियोजन चोख केल्याने भीमानदीला पूराचा धोका अजूनपर्यंत तरी निर्माण झाला नाही. त्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांमधून धरण प्रशासनाचे कौतुक व अभिनंदन केले जाते आहे.

उजनीची सद्यस्थिती

एकूण पाणी पातळी ४९७.२५५ मीटर

एकूण पाणी साठा ३४७७ .११ दलघमी
(१२२ टीएमसी)

उपयुक्त पाणी साठा १६६३.२९ दलघमी
(५९ टीएमसी)

टक्केवारी १०९ %

उजनीत येणारा विसर्ग

बंडगार्डन ३२८०

दौंडमधून ५११७

उजनीतून सोडलेला विसर्ग

भीमानदी ३०,०००

कालवा २४००

बोगदा १०००

सीनामाढा उपसासिचंन २२२

दहिगाव १०५

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा