विठ्ठल रुख्मिणीच्या पूजेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सपत्नीक निमंत्रण

पंढरपूर, दि.१२ जून २०२०: यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीची वारी होणार नसली तरी विठ्ठल रुख्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक करणार आहेत. तसे अधिकृत निमंत्रण विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्र्यांना दिले आहे. अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३५० वर्षात प्रथमच यंदाच्या वर्षी आषाढी यात्रा भरणार नाही. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी कोणत्याही भाविकाने बाहेर पडू नये, असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.

मात्र, यंदाच्या वर्षी विठ्ठलाची पूजा करायची की नाही आणि कोणी करायची हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र काही वर्षांपासून या पूजेचा मान मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला देण्यात आला आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिर समितीने मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी सपत्नीक निमंत्रण दिले आहे.

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या स्वाक्षरीने ई-मेलवर मुख्यमंत्र्यांना रीतसर पूजेचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

त्यामुळे मंदिर समितीच्या निमंत्रणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्‍मी ठाकरे आणि मुलगा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे एकत्रित येऊन विठ्ठल रुख्मिणीची पूजा करणार आहेत.अशी माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा