विवेक अग्निहोत्रींचा शरद पवारांना टोला…

31

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कलेच्या क्षेत्रात अल्पसंख्याकांचे योगदान लक्षणीय आहे. त्यामागे उर्दू भाषेचं योगदान महत्वाचं आहे. आज आपण बॉलिवूडमध्ये पाहतो, तर बॉलिवूडमध्ये मुस्लिमांचा योगदान नाकारता येणार नाही, असं शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं. आता शरद पवार यांच्या या वक्तव्यावर अनेक जण टीका करत आहेत.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्वीट शेअर करुन शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं की, ‘मी जेव्हा मुंबईमध्ये आलो होतो. तेव्हा शरद पवार हे राजा होते. त्यांचा पक्ष कर गोळा करत असे. अनेक बॉलीवूडकरांनी त्यामध्ये योगदान दिले. त्या बदल्यात त्यांना स्वतःचे राज्य निर्माण करण्याची मुभा देण्यात येत होती. मला नेहमी प्रश्न पडतो की ते लोक कोण आहेत? शरद पवार यांच्या या भाषणामुळे माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या.’असं ट्वीट करत विवेक अग्निहोत्री यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

त्याचबरोबर त्यानी असेही म्हंटले की, ‘हाहाहा, निषेध… देवा त्यांना जन्नत देवो. कारण आयुष्यभरात त्यांनी जहन्नुममधील त्यांची वर्षे पूर्ण केली आहेत.’
विदर्भ मुस्लिम इंटलॲक्चुअल फोरम’च्या मंचावर ॲड. फिरदोस मिर्झा यांनी अल्पसंख्यांक समाजातील समस्या अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मांडल्या. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या भाषणामधून कलेच्या क्षेत्रातील अल्पसंख्याकांच्या योगदानाबद्दल सांगितलं.
काही दिवसांपूर्वी विवेक अग्रिहोत्री यांचा द कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यातही त्यांनी काश्मिर प्रश्नावर प्रकाशझोत टाकला होता. शरद पवार हे कायम मुस्लिम धर्माच्या लोकांबद्दल हळवेपणा करत असल्याचं अग्निहोत्री यांनी नमूद केलं. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा मुस्लिम विरुद्ध हिंदू ही आढी निर्माण करण्याचा प्रयत्न शरद पवार करत असल्याचा अग्निहोत्रींनी अनाहूतपणे आरोप केला आहे, असंच म्हणावं लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा