पुणे, 18 मे 2022: चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनला Vivo Y01 असे नाव दिले आहे. हा कंपनीचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. यात 5000mAh बॅटरी आणि HD+ स्क्रीन आहे.
Vivo Y01 मध्ये कंपनीने MediaTek प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन Android 11 Go Edition ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. आधीच नमूद केल्याप्रमाणे, हा कंपनीचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे, ज्यामुळे तुम्हाला यामध्ये जास्त फीचर्स दिसणार नाहीत.
Vivo Y01 किंमत आणि उपलब्धता
Vivo Y01 फक्त एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. यात 2GB रॅमसह 32GB इंटरनल मेमरी आहे. कंपनीने त्याची किंमत 8,999 रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन एलिगंट ब्लॅक आणि सॅफायर ब्लू कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.
ग्राहक देशभरातील ऑनलाइन Vivo ई-स्टोअर आणि ऑफलाइन अधिकृत रिटेल स्टोअरमधून Vivo Y01 स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
Vivo Y01 चे डिटेल्स आणि फीचर्स
Vivo Y01 मध्ये 6.51-इंचाची HD+ स्क्रीन आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 720×1600 आहे. हा स्मार्टफोन Android 11 Go Edition आधारित FunTouch OS 11.1 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये Octa core MediaTek P35 चिपसेट देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम देण्यात आली आहे. यात 32GB इंटरनल मेमरी आहे. हे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर या फोनच्या मागील बाजूस 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. या फोनमध्ये पॉवरसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे