मुंबई, ४ ऑगस्ट २०२० : चीनी मोबाइल कंपनी विवो यावर्षी आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वा पासून दूर राहणार आहे. तथापि, विवोच्या कराराला तीन वर्षे शिल्लक आहेत, म्हणून चिनी मोबाइल कंपनी २०२१, २०२२ आणि २०२३ च्या आयपीएलमध्ये पुन्हा सामील होईल. आयपीएलमध्ये या हंगामासाठी नवीन स्वतंत्र प्रायोजक असतील. आयपीएलच्या नवीन प्रायोजकांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमा विवाद सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च आणि उत्पादनावर भारतामध्ये बहिष्कार टाकला गेला आहे. विशेष म्हणजे भारताची मोबाईल बाजारपेठ चिनी कंपन्यांनी व्यापली आहे आणि त्यातील मोठी कंपनी म्हणजे विवो. याचा परिणाम आता आयपीएल २०२० वर देखील झालेला दिसत आहे. भारतात चिनी उत्पादनांचा तीव्र विरोध आहे. विवो एक चीनी फोन निर्माता आहे. त्यामुळे आता या वर्षी या कंपनीला देखील आयपीएल मधून वगळण्यात आले आहे.
गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर देशभर आता चीन विरोधात आक्रोश निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
२०१८ मध्ये चिनी स्मार्टफोन कंपनीने २१९९ कोटी रुपयांची मोलाची रक्कम खर्च करून ५ वर्षांसाठी हे कंत्राट मिळविले होते.विवोचा आयपीएलबरोबर २०२३ पर्यंत करार आहे. यापूर्वी स्वदेशी जागरण मंचने (एसजेएम) आयपीएलसाठी चिनी प्रायोजकांसमवेत राहण्याचे बीसीसीआयच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते तसेच म्हटले होते की, जनतेने आयपीएलवर बहिष्कार टाकावा.
न्यूज अनकट प्रतिनिधी