Vivo Y75 5G लाँच, 50MP कॅमेरासह 5000mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत

पुणे, 28 जानेवारी 2022: Vivo Y75 5G स्मार्टफोन भारतात लाँच झालाय. चायनीज ब्रँड गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनची टीज काढत होते. हा फ्लॅट-स्क्रीन फोन 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरवर काम करतो. यात 5000mAh बॅटरी आहे. एक्सटेंडेड RAM फीचर Vivo Y75 5G मध्ये देखील उपलब्ध आहे.

Vivo Y75 5G ची भारतात किंमत

Vivo चा हा फोन 21,990 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आलाय. स्मार्टफोन फक्त एका कॉन्फिगरेशन 8GB RAM + 128GB स्टोरेजमध्ये लॉन्च करण्यात आलाय. तुम्ही तो दोन रंग पर्यायांमध्ये खरेदी करू शकता – ग्लोइंग गॅलेक्सी आणि स्टारलाईट ब्लॅक. हा हँडसेट विवोच्या अधिकृत वेबसाइटवर आणि त्याच्या रिटेल पॉर्टनर्सद्वारे उपलब्ध आहे.

ड्युअल सिम सपोर्ट असलेला Vivo चा हा फोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो. यात 6.58-इंचाची फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी स्क्रीन आहे. Vivo Y75 5G स्मार्टफोन Octacore MediaTek Dimensity 700 प्रोसेसरवर काम करतो, जो 8GB RAM सह येतो.

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय, ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे. याशिवाय फोनमध्ये 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP बोकेह कॅमेरा उपलब्ध आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 128GB इन-बिल्ट स्टोरेज आहे, जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते.

कनेक्टिव्हिटी फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 5G, 4G LTE, ब्लूटूथ, वायफाय, GPS आणि FM रेडिओ सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. 5000mAh बॅटरी असलेलं हे उपकरण 18W चार्जिंग सपोर्टसह येतं. याचं वजन 188 ग्रॅम आहे आणि त्यात USB Type-C चार्जिंग पोर्ट आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा