Vivo चा लेटेस्ट 5G स्मार्टफोन लॉन्च, ५०MP ड्युअल कॅमेरासह ५०००mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत

पुणे, २८ जुलै २०२२: Vivo चा नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. कंपनीने या फोनला Vivo Y30 5G असे नाव दिले आहे. यात MediaTek Dimensity 700 चिपसेट, ५,०००mAh बॅटरी आणि ५०-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

Vivo Y30 5G चे डिटेल्स आणि फीचर्स

Vivo Y30 5G मध्ये ६.५१-इंचाची IPS LCD स्क्रीन आहे. हा स्मार्टफोन HD+ रिझोल्यूशनसह येतो. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिझाइनसह योटो. त्याच्या बॉटम पाशी पातळ बेझल देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की त्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो ८९% आहे.

या डिव्हाईस च्या पॉवर बटणामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर एम्बेड केले गेले आहे. या हँडसेटमध्ये फेस अनलॉक देखील सपोर्ट करण्यात आला आहे. Vivo Y30 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी आहे.

कंपनीने यामध्ये 2GB पर्यंत एक्सटेंडेड रॅम फीचर दिले आहे. त्याची इंटरनल मेमरी मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते. हे डिव्हाइस Android 12 OS आधारित FunTouch OS 12 UI वर काम करते. या फोनमध्ये १०W चार्जिंग सपोर्टसह ५,०००mAh बॅटरी आहे.

फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी ८-मेगापिक्सलचा कॅमेरा समोर देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा ५०-मेगापिक्सेल आहे. यासोबत २-मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम, 5G, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ ५.१, एक USB-C पोर्ट आणि ३.५mm हेडफोन जॅक आहे. त्याचे वजन सुमारे १९३ ग्रॅम आहे. हा फोन चीनमध्ये लॉन्च केलेला iQOO U5e ची रिब्रँडेड आवृत्ती आहे. तथापि, iQOO U5e मध्ये १८W चार्जिंग सपोर्ट आहे.

Vivo Y30 5G किंमत आणि उपलब्धता

Vivo Y30 5G सध्या थायलंडमध्ये सादर करण्यात आला आहे. त्याची किंमत ८,६९९ THB (सुमारे १८,९०० रुपये) ठेवण्यात आली आहे. स्टारलाईट ब्लॅक आणि रेनबो फॅटॅलिटी या दोन रंगांमध्ये ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. भारतातील लॉन्चबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा