वोडाफोनला पन्नास हजार कोटींचा तोटा

मुंबई: दूरसंचार सेवेतील तीव्र स्पर्धा आणि सर्वोच्च न्यायालयाचे थकीत परवाना शुल्क भरण्याचा दिलेला आदेश यामुळे वोडाफोन आयडिया ला सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत तब्बल ५० हजार ९२१ कोटींचा तोटा झाला आहे. भारतात व्यवसाय करणे जिकरीचे झाल्याचे कबूली नुकतीच वोडाफोनच्या प्रमुखांनी दिली होती. सट्टा मट्टा या पार्श्वभूमीवर कंपनीला झालेल्या प्रचंड तोट्याने कंपनीचे भारतातील भवितव्य धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.
सरकारने लावलेल्या या दंडामध्ये एअरटेल आणि जिओ या कंपन्यांचाही समावेश आहे. वोडाफोन आयडिया नंतर एअरटेल ला सर्वात जास्त दंड बसणार आहे व सर्वात कमी जिओ या दूरसंचार कंपनीला बसणार आहे. यामध्ये बीएसएनएल या सरकारी कंपनीचाही समावेश आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा