रशियात ज्वालामुखीचा उद्रेक, विमानसेवा धोक्यात

रशिया, ११ एप्रिल २०२३: रशियातील सर्वात मोठ्या आणि सक्रिय ज्वालामुखीपैकी एक असलेल्या शिवलुच ज्वालामुखीचा मंगळवारी सकाळी उद्रेक झाला. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राखेचे ढग अनेक किलोमीटर उंचीवर पोहोचले. यानंतर आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र राख पसरली.

कामचटका व्होल्कोनिक इरप्शन रिस्पॉन्स टीम (KVERT) ने सांगितले की, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर विमान वाहतूक विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ज्वालामुखीचा १५ किमी उंचीपर्यंतचा उद्रेक कधीही होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. विमान कंपन्यांसाठी रेड कोड जारी करण्यात आला. रशियाच्या ज्वालामुखी वेधशाळेनेही शिवलुच ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर सुरक्षा सूचना जारी केल्या. या ज्वालामुखीच्या हालचालीमुळे आंतरराष्ट्रीय आणि कमी उडणाऱ्या विमानांवर परिणाम होऊ शकतो.

रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्सच्या जिओफिजिकल सर्व्हेच्या कामचटका शाखेच्या संचालक डॅनिला चेब्रोव्ह यांनी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार सकाळी ६:३१ वाजता ज्वालामुखीचा उद्रेक झाला. स्फोटानंतर, ज्वालामुखीची राख २० किमी उंचीपर्यंत पोहोचली होती.

न्यूज अनकट प्रतिनीधी : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा