वृद्धाश्रमासाठी अभिनेते विक्रम गोखले देणार स्वतःची एक एकर जागा

पुणे, दि.२८ मे २०२० : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मात्र आताही त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा आणि अंगी असलेला दानशूर पणा दाखवून दिला आहे. त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांसाठी वृद्धाश्रम बांधण्यासाठी नाणेगाव येथील सुमारे स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन महामंडळाकडे देणार असल्याची घोषणा बुधवारी (दि.२७) केली आहे. त्यामुळे काम न मिळाल्याने या आश्रमातून राहून आपला उदरनिर्वाह करता येणार आहे. विक्रम गोखले यांनी पुन्हा एकदा समाजासमोर आदर्श घालून दिला आहे.

याविषयी बोलताना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, लॉक डाऊन उठल्यानंतर ही जागा महामंडळाला देण्याबाबत करार होणार आहे. या जागेची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे आपल्या कसदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्याचबरोबर ते त्यांच्या मोठेपणासाठीही पण ओळखले जातात. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला होता. त्यांचा दानशूरपणा आता कलाकारांच्या वृद्धाश्रम बांधण्याच्या संकल्पनेतूनही दिसून येत आहे.
त्यांच्या या दानशूर पणाचा इतरांनी आदर्श घेणे गरजेचे आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा