नवी दिल्ली (वृत्त संस्था) : सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. एमिरेट्स A-३८० विमानावर वीज कोसळत असल्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘रॉयटर्स’या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडमध्ये आलेल्या तुफान वादळाचा फटका विमानसेवेलाही बसला. वादळामुळे क्राइस्टचर्च इथल्या विमानतळावर विमान थांबवण्यात आले होते.
विमानातील प्रवासी वेटिंगरुममध्ये बसले होते. त्यावेळी बाहेर विजा चमकत होत्या. सगळे प्रवासी वादळ शमण्याची वाट पाहात होते. दरम्यान यावेळी वीज चमकत असताना एका प्रवाशानं त्याच्या कॅमेऱ्यात हा फोटो क्लिक केला आहे.
डॅनियल करी नावाच्या तरुणाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो भयानक असल्याचे त्याने म्हटले आहे. न्यूझीलंडमधील काही भागांमध्ये बुधवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी विश्रामगृहात असलेल्या एका प्रवाशाने वीज कोसळतानाचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे.
हे छायाचित्र पाहून विमानावर वीज कोसळत असल्यासारखं वाटतं आहे. अप्रतिम आणि तितकाच अंगावर काटा आणणारा फोटो असल्याचं छायाचित्र काढणारे डॅनियल करी यांनी म्हटले आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्त संस्थेनं यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता.त्यामुळे हा फोटो फारच भयानक दिसतो आहे.